वढू बुद्रुक येथे शेतात पाणी भरण्याच्या वादातून सख्खा भावाने केली भावाला मारहाण

शिक्रापूर

वढू बुद्रुक (ता.शिरूर ) येथे शेतात पाणी भरायला भरण्याच्या कारणावरून सख्ख्या भावाने आपल्या भावाला मारहाण केल्याची घटना (दि. ३) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वढू बुद्रुक येथील रानमळा येथे घडली .

याबाबत मधुकर बबन मांढरे ( वय ५१,रा.वढू बुद्रुक,ता. शिरूर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मधुकर मांढरे हे आपल्या बाजरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांचा भाऊ बाबासाहेब बबन मांढरे याने माझ्या शेतातून पाईपलाईन टाकून पाणी घ्यायचे नाही असे म्हणत फिर्यादी याला जमिनीवर पाडून शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मांढरे करत आहे.

Previous articleजारकरवाडी येथे उसाचा रसाचे मशीन व किराणा साहित्याची चोरी
Next articleकोरेगाव भीमा येथे भरधाव वेगात ट्रकची ट्रॅव्हल बसला धडक ; बसचा चालक ठार