जारकरवाडी येथे उसाचा रसाचे मशीन व किराणा साहित्याची चोरी

Ad 1

प्रमोद दांगट, निरगुडसर

जारकरवाडी (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत जारकरवाडी फाटा येथील पत्रा शेड मध्ये असलेल्या हॉटेल शौर्य, शंभु किराणा अँड जनरल स्टोअर ,व झांजुरणे बाबा रसवंतीगृह येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून उसाचे रसाचे मशीन व किराणामाल असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत दुकानदार मालक ओमकार मनोहर खेडेकर ( रा.नागापूर ता.आंबेगाव ,पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की खेडेकर यांचे जारकरवाडी फाटा येथे रसवंती गृह व किराणा मालाचे दुकान असून ते ( दि.२८) रोजी आपले दुकान बंद करून घरी आले होते त्यानंतर (दि. १) रोजी ते सकाळी सात वाजता आपले दुकान उघडण्यासाठी केले असतात दुकानाच्या पत्राशेडचे वरील छताचा पत्रा त्यांना उचकटलेला दिसला. त्यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले असता किराणा साहित्य व सीसीटीव्ही मशीन, रसाचे मशीन कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या चोरीत ३० हजार रुपये किमतीचे उसाच्या रसाचे मशीन ,१५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही, डी.व्ही.आर मशीन व २५ हजार रुपये किंमतीचे किराणा साहित्य ( तेलडबे ,तांदूळ ,बिस्कीट पुडे )असे एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याबाबत खेडेकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हागवणे पुढील तपास करत आहे.