पूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभाताई गावडे तर उपसरपंचपदी नामदेव गावडे यांची बिनविरोध निवड

राजगुरुनगर – पूर (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभाताई गावडे तर उपसरपंचपदी नामदेव गावडे यांची बिनविरोध निवड झाली.

सात सदस्य असलेल्या खेड तालुक्यातील पूर्व भागातील पूर गावची ग्रामपंचायत निवडणूक राजकीय द्रुष्टीने अटीतटीची होत आसते.खेडच्या वेगाने होणाऱ्या या भागाची प्रगती पहाता ही निवडणूक आखेर भावकीचे जुने वाद मिटवत नव्या दिशेने झाल्याने अनेक राजकीय खेळीना मोठी खीळ बसवत तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणाला नवीन दीशा देण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे सदस्य पदाची निवडणूक झाल्या नंतर काहीशे सर्व मतभेद बाजूला ठेवत सातही सदस्य एकत्र येत सरपंच प्रतिभा गावडे व उपसरपंच नामदेव गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल करत निवड बिनविरोध केली.

यावेळी किरण गावडे, संगीता विलास गावडे ,लता गोरक्ष गावडे ,रूपाली प्रकाश गावडे, किशोर आनंदा सावंत या ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन गावच्या विकासासाठी आम्ही सर्वत्र एकत्र येऊन गावाचा विकास करू अशी ग्वाही पूर ग्रामस्थांना दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. वी. विटे, ग्रामसेवक गायकवाड , सुनील गायकवाड व अमित रांधवण यांनी काम पाहिले .

यावेळी श्री दत्त नगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाब वाघा गावडे व माजी उपसरपंच जयसिंग गावडे,अशोक गावडे, भरत गावडे, सोमनाथ गावडे, श्रीनिवास गावडे, अभिजित गावडे,सचिन गावडे, धनंजय गावडे, गणेश गावडे,तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleकळमोडी योजनेचे अंदाजपत्रक व सुधारित प्रकल्प अहवाल शासनास सादर होणार
Next articleनिवेदन देऊनही डेंगू बाबत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष…