कळमोडी योजनेचे अंदाजपत्रक व सुधारित प्रकल्प अहवाल शासनास सादर होणार

राजगुरूनगर-गेली अनेक वर्षे सर्वेक्षणात अडकलेल्या कळमोडी उपसा जलसिंचन योजनेबाबत कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग पुणे यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना अहवाल पाठविला आहे.

खेड तालुक्याच्या पुर्व भागातील कनेरसर, पुर,वरूडे ,वाफगाव परिसरातील व शिरूर तालुक्यातील केंदुर,पाबळ परिसरातील अवर्षणग्रस्त गावांसाठी कळमोडी योजनेचे पाणी देण्याबाबत दि.19/8/2019 रोजी शासन मान्यतेसाठी पाठविला असल्याचे नमूद करण्यात आला आहे,यामुळे वाढीव क्षेत्राला शासनाने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून आजतागायत मान्यता घेतली नाही.कळमोडी धरणाचे चासकमान धरणासाठी राखीव ठेवलेले 1.07टीएमसी पाणी उपसा योजनेला देऊन वाढीव गावांना दिले जावे या अशोकराव टाव्हरे यांनी केलेल्या मागणीनुसार दि.19/10/2019 रोजी महामंडळास मुख्य अभियंता जलसंपदा विभाग,पुणे यांनी अहवाल सादर केला आहे.

कळमोडी योजनेचा सुप्रमा व तांत्रिक मंजुरी होऊन आगामी अर्थसंकल्पात निधी तरतुद होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात व्हावी याबाबत या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रासाठी बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे सिंचन करणेसाठीचे सविस्तर सर्वेक्षण, संकल्पन व अंदाजपत्रक पुर्ण करण्याचे काम पुर्ण झाले असून प्रचलित दरसुचीप्रमाणे अद्ययावत करण्याचे काम पुर्ण केले असून राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या तपासणी सुचीनुसार सदर प्रकल्पाचा अहवाल करण्याचे काम प्रगतीत आहे.सद्यस्थितीत क्षेत्रीय स्तरावर अंदाजपत्रकाची कार्यवाही प्रगतीत असुन सदर अंदाजपत्रक प्राप्त होताच सुधारित प्रकल्प अहवाल सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे म.ऊ.गिरासे सहा.मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग पुणे यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
अशोकराव टाव्हरे यांनी याबाबत आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, परंतु कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नाही. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग पुणे यांनी महामंडळास पाठविलेल्या अहवालानुसार तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी टाव्हरे यांनी
म.ऊ.गिरासे,सहा.मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग पुणे यांची भेट घेऊन केली आहे.

Previous articleदारूभट्टीवर शिरुर पोलिसांचा छापा; सुमारे 1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त
Next articleपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभाताई गावडे तर उपसरपंचपदी नामदेव गावडे यांची बिनविरोध निवड