निवेदन देऊनही डेंगू बाबत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष…

सिताराम काळे, घोडेगाव

– घोडेगाव (ता. आंबेगाव) व परीसरात चार महिन्यांपासून डेंग्यु सदृश तापाचे रूग्ण आढळत आहे. घोडेगाव ग्रामपंचायत स्वच्छता ठेवण्यास अपयशी ठरले असून त्यांनी केलेल्या फवारण्या निष्फळ ठरल्या आहेत. याबाबत वारंवार लेखी निवेदन देऊनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे लेखी निवेदन आंबेगाव तालुका आरोग्य विभागास सामाजीक कार्यकर्ते नंदकुमार बो-हाडे यांनी दिले आहे.

बो-हाडे यांनी दि. २६ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले की, घोडेगावात सार्वजनिक शौचालय असणा-या ठिकाणी अस्वच्छता आहे. कुठेही जंतुनाशक पावडर टाकत नाही. कर भरणा-या नागरिकांच्या आरोग्याला घातक असणा-या बाबींचा नायनाट करणे, स्वच्छता ठेवणे ग्रामपंचायतीचे काम आहे. परंतु ते काम करत नाही. नदीपात्रात टाकलेल्या कच-यामुळे दुर्गंधी पसरली आहे. प्लॅस्टिक कागद जाळल्याने विषारी वायू पसरत आहे. या बाबी तालुका आरोग्य विभागाच्या निदर्शनात आणूनही दखल घेतली नाही. दि. ५ ते २५ फेेब्रुवारी दरम्यान घोडेगाव प्रभाग क्र. ३ मध्ये एका कुटुंबातील ७ व्यक्तिंना डेंग्युची लागण झाली आहे. सर्वजण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. तसेच इतर ठिकाणीही डेंग्युचे रूग्ण आढळत आहे.

घोडेगाव परीसरामध्ये दि. १९ नोव्हेंबर २०२० पासुन ते आजपर्यंत डेंग्यु सदृश तापाने सुमारे २५० नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. यासाठी आरोग्य विभागाने याची दखल घेत त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे नंदकुमार बो-हाडे यांनी केली आहे.

Previous articleपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभाताई गावडे तर उपसरपंचपदी नामदेव गावडे यांची बिनविरोध निवड
Next articleसदगुरु सेवा विकास प्रतिष्ठान संचलित मायमाऊली अनाथ वृध्दाश्रमचे उद्घाटन