दावडीत ज़ंतनाशक गोळ्यांचे वाटप

दावडी- येथील सरकारी दवाखान्यात लहान मुलांना जंत नाशक गोळ्याचे डोस सरपंच संभाजी घारे व उपसरपंच राहुल  कदम यांच्या हस्ते देण्यात आला .

मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे आतड्याचा कृमीदोष होत असल्याने हा कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे प्रमुख कारण असल्याने मुला-मुलींना ज़ंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे सरपंच संभाजी घारे यांनी सांगितले

यावेळी दावडी गावचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, श्री अनिल नेटके, श्री संतोष सातपुते सौ.धनश्रीताई कान्हुरकर सौ पुष्पाताई होरे, सौ.माधुरीताई खेसे व डाॕ.कोतुरकर मँडम आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते …

Previous articleनिधन वार्ता- मच्छिंद्र जांभुळकर यांचे निधन
Next articleदारूभट्टीवर शिरुर पोलिसांचा छापा; सुमारे 1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त