दारूभट्टीवर शिरुर पोलिसांचा छापा; सुमारे 1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

आवाज जनतेचा आँनलाईन

शिक्रापुर -शिरूर तालुक्याच्या रावडेवाडी येथे पोलिसांची दारू बनवणाऱ्या दारू भट्टिवर छापा टाकत गावठी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे बॅरल, रसायन, दारू बनविण्याचे साहित्य असा सुमारे १ लाख ३७ हजार चा मुद्देमाल जप्त करत दोघा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

या कारवाईत वीस बॅरल दारू बनवण्याचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. तर दारू बनवणारे दोघे फरार झाले आहेत. पोलीस अंमलदार करणसिंग निहालसिंग जारवाल (शिरुर पोलीस स्टेशन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.तर अर्जुन सदाशिव हीलाळ (रा कवठे यमाई मुंजळवाडी , ता.शिरूर), सुभाष पानगे (रा .निमगाव दुडे तालुका शिरूर जिल्हा पुणे)या दोघांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती नुसार रावडेवाडी गावात ओढयाचे कडेला काटेरी झुडपामध्ये अर्जुन सदाशिव हिल्लाळ, सुभाष पानगे हे हातभट्टी दारुची भट्टी व गावठी हातभटटी दारू तयार करीत असल्याची माहिती गोपनिय बातमीदारा मार्फत पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना मिळाली.त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरूदव काबुगडे, पोलीस अंमलदार करण सिंग जारवाल, पोलीस पोलीस अंमलदार प्रवीण पिठले, पोलीस नाईक संजू जाधव या पथकाने रावडेवाडी येथील माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता दारूभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांची चाहूल लागताच वरील दोघे आरोपी पळुन गेले.त्यााठिकाणी वीस बॅरल दारू तयार करण्याचे रसायन, 200 लिटर मापाचे कच्चे रसायन प्रत्येकी 30 रु लिटर किंमत,एक गोलाकार जर्मनची थाळी ,एक जर्मनचा चाटु , असा एकूण एक लाख 37 हजारचा ऐवज मिळाला असून, दारू तयार करण्याचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(c)65(d)83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे पोलिस हवालदार राजेंद्र गवारे करीत आहे.

Previous articleदावडीत ज़ंतनाशक गोळ्यांचे वाटप
Next articleकळमोडी योजनेचे अंदाजपत्रक व सुधारित प्रकल्प अहवाल शासनास सादर होणार