राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या खेड तालुका उपाध्यक्षपदी रूपाली गव्हाणे यांची निवड

राजगुरूनगर- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या खेड तालुका उपाध्यक्षपदी रूपाली गव्हाणे यांची निवड करण्यात आली.आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी संतोष गव्हाणे मा.सरपंच, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष आशा तांबे , मयुर मोहिते पाटील, कल्याणी गायकवाड, आरती टाकळकर तसेच विविध स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआंधळगाव येथे रक्तदान शिबिरात ५२ पिशव्या रक्त संकलित
Next articleनिधन वार्ता- मच्छिंद्र जांभुळकर यांचे निधन