आंधळगाव येथे रक्तदान शिबिरात ५२ पिशव्या रक्त संकलित

न्हावरे :आंधळगाव (ता. शिरूर)येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आंधळगाव (ता. शिरूर)येथे आदिकभाऊ कुसेकर युवा मंच हे सातत्याने विधायक उपक्रम राबवित आहेत.यावर्षी शिवजयंती साधेपणाने साजरी करत प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.प्रारंभी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यानंतर प्रत्यक्ष शिबिरास सुरुवात करण्यात आली.या शिबिरात आंधळगाव व परिसरातील युवकांनी सहभाग घेत सुमारे ५२ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.रक्तदान करणाऱ्या रक्तदांत्याना प्रमाणपत्र भेट देण्यात आले.यावेळी ससूनचे शरद देसले, केशव कुसेकर,विशाल देवकर,भानुदास थोरात,सुनिल खांडेकर,अमर शिंदे,तेजस भोसले,शेखर नलगे,विक्रम सकट,गणेश पाटोळे,सोमनाथ कुसेकर, पत्रकार प्रमोल कुसेकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी आंधळगाव व पंचक्रोशीतील युवक,ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.

Previous articleसुधीर वाळुंज यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
Next articleराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या खेड तालुका उपाध्यक्षपदी रूपाली गव्हाणे यांची निवड