राजगुरुनगर मध्ये सोशल डिस्टनसचे नियम धाब्यावर बसवत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी तर दारू खरेदीसाठी झुंबड

बाबाजी पवळे

राजगुरुनगर : खेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना सोशल मीडियावर खेड तालुका बंदचे मेसेज व्हायरल झाल्याने राजगुरुनगर येथे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.त्यामुळे रस्त्यावर ,दुकानात आणि मॉल मध्ये गर्दी झाली होती तर दारू खरेदीसाठी झुंबड उडाली होती

दरम्यान प्रशासनाकडून खेड तालुका बंद ठेवण्यान्या बाबत कोणताही निर्णय घेत नसताना राजगुरूनगर शहरातील नागरिक व व्यापारी एकत्र येत राजगुरूनगर शहर दि ५ ते १५ जुलै पर्यंत कडकडीत बंद करण्याबाबत निर्णय करण्यात आला आणि याबाबत चे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले गेले त्यामुळे नागरिकांनी राजगुरूनगर शहर बंद होण्या अगोदर घरातील वापरासाठी लागणारे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी राजगुरुनगर शहरात एकच गर्दी केली होती.त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचा फज्जा उडाला असून सोशल डिस्टनचे नियम न पाळता नागरिक सगळीकडे फिरताना दिसत होते. या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत

Previous articleरेल्वेमार्गाच्या भूमिगत रस्त्यात साठणारे पाणी तातडीने काढून टाकण्याचे आदेश खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी रेल्वे अभिय़ंत्यांना दिले
Next articleखेड, आळंदी व चाकणसह ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम