Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजगुरुनगर- सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील सुळके नेहमीच गिर्यारोहकांना भुरळ घालत असतात. असाच ट्रेकिंगच वेड लागलंय या खेड तालुक्यातील काही तरुण सह्य भटक्यांना.रविवारी (दि. 29 नोव्हेंबर) ला भल्या पहाटे पाच वाजता या गिर्यारोहण मोहिमेला सुरुवात झाली .
गावाकडच्या घरगुती पोह्यांचा नाश्ता करून सर्व मंडळी किल्ले जीवधन च्या दिशेने मार्गस्थ झाली. समोर दिसणारा तो काळा कभिन्न वानर लिंगी सुळका (अंदाजे 430 फूट) त्या पहाटेच्या अंधारात अजूनच राकट दिसत होता. अगोदर जीवधन ची सैर करून नंतर सुळका आरोहण करायचे ठरलं.

जवळपास दुपारी 4 वाजता सुळका आरोहणाला सुरुवात झाली. नाशिक च्या पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचर टीम च्या सहकार्याने रोप लावण्यात आले होते. सगळ्यात अगोदर पाहुणे म्हणून उपस्थित सचिन पुरी यांनी कातळकडा चढायला सुरुवात केली. त्यांच्या मागोमाग मेकॅनिकल इंजिनीअर अक्षय भोगाडे हेही वेगाने कातळकडा चढत होते. स्वतः पोलिस असणाऱ्या उषा होले या महिला गिर्या रोहकांच प्रतिनिधित्व करत होत्या. त्यापाठोपाठ वयाने लहान तसेच नवीन सभासद प्रियांका जढार याही कुठेही मागं राहत नव्हत्या. मोशीचे रवी भाऊ कुंभार हे त्या मागोमाग रॉक पॅच चढुन वर येत होते. थोडासा अंधार होत असल्यामुळे अजून दोन सभासद काजल दौंडकर आणि विशाल भाऊ (उदगीर) यांना जवळपास 200 फुटांवर थांबावे लागले.
अशा तऱ्हेने संध्याकाळी 6.00 वाजता ही वानर लिंगी सुळका आरोहण मोहीम फत्ते झाली. पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचर चे जॉकी साळुंके, किशोर माळी, चेतन शिंदे, दर्शन आदी तर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात असेच सुळके सर करण्याचा त्यांचा मानस आहे.
🖊️शब्दांकन : युवा गिर्यारोहक🧗🏻♂️ अक्षय भोगाडे (राजगुरुनगर)
Download WordPress Themes Nulled and plugins.