बॉश चासीज सिस्टीम इंडियाच्या कामगारांना पगार वाढ

चाकण-अस्थिर औद्योगिक वातावरणामध्ये अतिशय सामंजस्याने व सकारात्मकतेने महागाईशी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. कामगार उपआयुक्त व सहाय्यक कामगर आयुक्त (समेट अधिकारी) यांच्या मध्यस्थीने या ऐतिहासिक करारावर एकमत झाले. दि.1 जानेवारी 2020 ते 31 December 2023 या चार वर्षाच्या कालावधीसाठी सध्याच्या (31 डिसेंबर 2019 रोजीच्या) पगारावर कमीत कमी 8%(आठ टक्के) व जास्तीत जास्त 10% (दहा टक्के) महागाईशी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले.वार्षिक आठ टक्के पेक्षा कमी टक्के महागाई वाढ झाली तरी आठ टक्के पगारवाढ मिळेल किंवा वार्षिक दहा टक्क्यांपेक्षा जास्त महागाई वाढली तरीही दहाच टक्के पगारवाढ मिळेल किंवा आठ ते दहा मध्ये प्रत्यक्ष महागाईमध्ये जी वाढ झाली असेल त्याप्रमाणात पगार वाढ मिळेल. औद्योगिक शांतता टिकवण्याच्या हिशोबाने अतिशय व्यवहार्य आणि सकारात्मकपणे कंपनीच्या व कामगारांच्या हितासाठी तसेच महाराष्ट्रातील व देशपातळीवरील अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील वेतनकरार करण्यासाठी पथदर्शी ठरेल असा गणितीय स्पष्ट सूत्र असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण वेतन करार बॉश चासीज सिस्टीम एम्प्लॉईज युनियन व बॉश चासीज सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे यांनी पूर्णत्वास नेला. कंपनीचे M D अविनाश चिंतावर साहेब , कामगार उपायुक्त विकास पनवेलकर साहेब, सहाय्यक कामगार आयुक्त व समेट अधिकारी विशाल घोडके साहेब यांच्या उपस्थितीत दि. 25 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीच्या सभागृहात कमिटीने सह्या केल्या.

बॉश चासीज सिस्टीम च्या कामगारांना या कराराद्वारे चार वर्षासाठी किमान वीस हजार तीनशे रुपये ते कमाल तेवीस हजार रुपये पर्यंत पगार वाढ मिळणार आहे.

कोविड साथीच्या महामारी मध्ये औद्योगिक अस्थिरता असतानाही अतिशय चांगल्या प्रकारचा,औद्योगिक शांतता टिकवणारा हा करार इतर कंपन्यांसाठी व कामगार संघटना साठी निश्चितच पथदर्शी ठरेल अस कराराच्या वाटा’घाटी दरम्यान बॉश HR/IR विभागाचे सीनियर जनरल मॅनेजर मोहन पाटील व प्लांट हेड विनोद व्यंकटेश तसेच HR मॅनेजर रवळनाथ पाटील यांचे सहकार्य लाभले.

संघटनेचे अध्यक्ष पंकज दौंडकर व जनरल सेक्रेटरी मनोज पाटील यांच्यासह सर्व कमिटी मेंबर यांनी अतिशय संयम आणि समन्वय राखत हा करार यशस्वी केला बॉश चासीज सिस्टीम एम्प्लॉईज युनियन चे कार्यकारी मंडळ सर्व सभासदांचे व ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या कराराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .

कंपनीच्या वतीने प्लांट हेड श विनोद व्यंकटेश साहेब, सि.जनरल मॅनेजर मोहन पाटील , सि मॅनेजर रवळनाथ पाटील सि. जनरल मॅनेजर (फायनान्स) यांनी कमीटी म्हणून तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष पंकज दौंडकर, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, खजिनदार भीमसेन कुलकर्णी, सहसेक्रेटरी शंकर जाधव, सहसेक्रेटरी चंद्रकांत औसेकर,विजय शिंदे , स्वप्नील गाढवे,आनंद लवूळकर यांनी कमिटी मेंबर म्हणून तर सौ. मनीषा पाटील व अतुल पोखरकर यांनी साक्षीदार म्हणून या करारावर सह्या केल्या. पुणे कामगार उपआयुक्त श्री.विकास पनवेलकर व समेट-अधिकारी (Conciliation Officer) म्हणून, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी या करारावर सह्या केल्या

Previous articleखेड तालुक्यातील गिर्यारोहकांकडून वानर लिंगी सुळका सर
Next articleचाकण- तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा – खासदार डॉ. अमोल कोल्हे