दिवगंत मित्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर; राजगुरूनगर मधील युवकांचा स्तुत्य उपक्रम

राजगुरुनगर- येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले या शबिरात ३११ जणांनी सहभाग घेतला. दिवगंत मित्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजगुरूनगर मधील युवकांनी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

स्वर्गिय समीर चासकर व युवराज शिंदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त मित्रपरिवाराच्या वतीने खेड बाजार समिती आवारात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. दरम्यान माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलिप मोहिते पाटिल, कांचन ढमाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे , खेड तालुका भिमशक्तीचे अध्यक्ष विजय डोळस, अरुण गिरे,आदी मान्यवर भेट दिली. आपल्या दिवंगत मित्रांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम राजगुरूनगर मधील युवक राबवीत असुन असे उपक्रम समाजाला प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी राजगुरूनगरचे बापू थिगळे, विकास थिगळे, निलेश थिगळे, नगरसेवक राहुल आढारी ,पप्पु वाडेकर,अनिल कदम, राहुल मोहिते,योगेश शिंदे,गणेश चासकर, प्रकाश पवार आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.पिंपरी चिंचवड ब्लड बँकेच्या माध्यमातून झालेल्या या शिबिरात ३११ युवकांनी रक्तदान केले.

Previous articleरेटवडीत रानडुकरांचा धुमाकूळ
Next articleकायदा झाल्यापासून काझड ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधीचे वाटप नाहीच..