रेटवडीत रानडुकरांचा धुमाकूळ

राजगुरूनगर-रेटवडी (ता खेड ) या परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील पिकाची नासधूस हि रानडुकरे करित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असुन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.

खेड तालुक्याच्या पुर्व भागात रानडुकरांनी धुमाकुळ घातला रेटवडी या परिसरात शेतकऱ्यांनी शेतात कांदा लागवड केल्या आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात कांदा रोप व मका पीक आहे.या पिकांत रान डुकरांचे कळप शिरत असुन पिकांची नासधुस होत आहे. रेटवडी येथील बाबळदरा येथे रानडुकरांनी मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. अधीच कांदा पीक अवकाळी पावसाच्या कच्याट्यात सापडले होते. त्यातुन कसेबसे वाचलेल्या पीकांचे रानडुक्करे नुकसान करित आहे.

तसेच महागड्या कांदा रोपांची रानडुकरे शेतात सुरुन नुकसान करित असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गणेश तुकाराम पवार ,भिवाजी बाळा रेटवडे, अनिल दत्तात्रय पवार,संतोष पोपट रेटवडे या शेतकऱ्यांच्या शेतात डुकरानी केले कांदा पिकांचे नुकसान केले आहे. या रानडुकरांचा वन खात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुभाष हिंगे यांनी केली आहे. तसेच प्रशासनाने रानडुकरांनी केलेल्या पिकांच्या नासाडीची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Previous articleतलवार बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
Next articleदिवगंत मित्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर; राजगुरूनगर मधील युवकांचा स्तुत्य उपक्रम