कायदा झाल्यापासून काझड ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधीचे वाटप नाहीच..

इंदापूर -तालुक्यातील काझड ग्रामपंचायतमधील सावळा गोंधळ कारभार समोर आला आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचे २०१६ मध्ये कायदा झाल्यापासून अद्याप पर्यंत वाटप करण्यात आले नाही.

दिव्यांग निधी संदर्भात गावातील दिव्यांग बांधवांची हेतुपुरस्कर हेळसांड करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. यामुळेच आज दिनांक ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून गावातील काही तरुण मुलांनी दिव्यांग बांधवांना एकत्र करून आपल्या गावांमध्ये दिव्यांग बांधव आहेत याची जाणीव करून देत ग्रामविकास अधिकाऱ्यांना तरवडाची फुले देऊन त्यांचा सत्कार केला.

येत्या आठ दिवसात जर दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी वितरित केला गेला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना चप्पल हार घालून कर्तव्याची जाणीव करून देऊ, असे ग्रामविकास अधिकारी राहूल सरक यांना सांगितले. त्यावेळी दिव्यांग बांधवांसह गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन नरूटे, प्रशांत नरुटे, हनुमंत वीर आदी उपस्थित होते.

Previous articleदिवगंत मित्रांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर; राजगुरूनगर मधील युवकांचा स्तुत्य उपक्रम
Next articleघरफोड्या करणाऱ्या कुख्यात सी. एम. टोळीचे सराईत गुन्हेगार जेरबंद