आदिवासी बांधवांची दिवाळी गोड; सह्याद्री प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम

बाबाजी पवळे- दिवाळीनिमित्त  आदिवासी बांधवांना सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले.आदिवासी वाड्यापाड्यांवरील वंचित समाजासोबत दिवाळी साजरी करण्याची सामाजिक जाणीव मूळ धरत आहे.सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळी सणानिमित्त गरीब, निराधार व आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ, कपड्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रतिष्ठानतर्फे खेड तालुक्यातील भीमाशंकर परिसरातील विठ्ठलवाडी, पाबे, भोमाळे, टेकवडे या आदिवासी भागात जाऊन तेथील मुले व आदिवासी बांधवांना फराळाचे व कपडे वाटप करण्यात आले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष गणेश नाणेकर,प्रशांत टोपे, कार्तिक पाटील, आकाश गायकवाड, रोहित गोंडवळ उपस्थित होते.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी भागात जाऊन गरीब मुलांना फराळ, नवीन कपडे, मिठाई, फटाक्यांचे वाटप केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Previous articleपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा ग्राहकांच्या हिताची- मोहिते पाटील
Next articleचांडोलीत बिबट्याचा धुमाकूळ : दोघा दुचाकीस्वारांवर जीवघेणा हल्ला