चांडोलीत बिबट्याचा धुमाकूळ : दोघा दुचाकीस्वारांवर जीवघेणा हल्ला

सिताराम काळे, घोडेगाव

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील वेताळ मळा येथे आज संध्याकाळी सातच्या सुमारास पाच मिनिटाच्या अंतराने दोन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केला आहे त्यात एका व्यक्तीला बिबट्याचा हल्ला वर्तविण्यात यश आले आहे. जिल्हा युवा सेना प्रमुख प्रवीण थोरात यांनी तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.

चांडोली बुद्रुक येथील वेताळमळा परिसरात दहा ते बारा दिवसापूर्वी जयदीप थोरात व ओमकार थोरात या दोन तरुणांवर दुचाकी वर जात असताना बिबट्याने हल्ला केला होता. ग्रामस्थांच्यावतीने वनखात्याला याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती पाच ते सहा दिवसापूर्वीच या ठिकाणी एका बिबट्याला वनखात्याला पकडण्यात यश आले होते.

मात्र आज संध्याकाळी सातच्या सुमारास लक्ष्मण चौरे आपल्या दुचाकीवर वेताळ येथून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने त्याने हल्ला केला, त्यांनी आपले वाहन जोरात पळवून, आरडाओरड केल्याने बिबट्याचा हल्ला पर्तविण्यात यशस्वी झाले मात्र पाच मिनिटानंतर त्याठिकाणी संतोष चिमन थोरात (वय ४५) हे आपल्या दुचाकी वरून त्या ठिकाणाहून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले आहे,ग्रामस्थांच्या वतीने या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवून बिबट्याला दूर पळूवन लावण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून ग्रामस्थांची भीती कमी होईल याचा प्रयत्न ग्रामस्थ करत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्या वारंवार हल्ला करत आहे आता ते मानवावर सुद्धा हल्ला करू लागल्याने चांडोली व परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

Previous articleआदिवासी बांधवांची दिवाळी गोड; सह्याद्री प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम
Next articleजनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला – अजित पवार