पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा ग्राहकांच्या हिताची- मोहिते पाटील

बाबाजी पवळे, राजगुरूनगर- खेड तालुक्यातील वाडा येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे ठरणारी आहे , असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले .नुकतेच वाडा येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएमचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी ते बोलत होते .

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, बँकेचे अधिकारी देवानंद गोपाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, बाळासाहेब गोपाळे, उमेश कुंभार, शिवाजी मोरे, किरण मोरे, नागेश हुंडारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

खेड तालुक्यातील पश्चिम भागात जिल्हा बँकेच्या एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांची सोय व्हावी , या दृष्टीने हे एटीएम सुरू होत असून , त्याची सेवा ही उत्तम असल्याने त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे, ग्रामीण भागातील येणाऱ्या ग्रामस्थांची पैशाच्या व्यवहारासाठी बँकेमध्ये उभे राहावे लागते व इतर एटीएम मध्ये जावे लागत होते. ही गरज ओळखून जिल्हा बँकेचे एटीएम सुरू केले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे नेहमीच प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे .असे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले .

Previous articleकार्तिकी एकादशीच्या निमित्ताने बालगंधर्वमध्ये अभंगवाणीचा भक्ती सोहळा संपन्न
Next articleआदिवासी बांधवांची दिवाळी गोड; सह्याद्री प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम