पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन राजगुरूनगर येथील ग्रीन पार्क सोसायटीतील महिलांनी केली फुलझाडांची लागवड

राजगुरुनगर : राजगुरूनगर येथील ग्रीन पार्क सोसायटी पडाळवाडी येथील महिलांनी पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन आपला परिसर सुशोभित करण्याच्या उद्देशाने सोसायटी मध्ये श्रमदानाने फुलझाडे लागवड करण्याचे ठरविले. फुलझाडे लागवड करण्याचा उपक्रम हाती घेताना महिलांनी स्वतः खड्डे खोदून ते शास्त्र शुद्ध पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करत भरून घेतले. झाडांच्या मुळांना कीड लागणार नाही त्या दृष्टिकोनातून खड्यांमध्ये औषधांचा वापर केला.

यावेळी सोसायटीचे चेअरमन जयेंद्र आंभेरे, पोलीस काँस्टेबल पवार साहेब यांच्यासह जेष्ठ महिला सौ.सांडभोर मावशी, पवार मावशी, रोडे ताई, गुंजाळ मावशी, चौधरी मावशी, माने ताई, दंडवते मावशी, रेवती ताई, अर्चना ताई, दुर्गे मावशी इत्यादी महिलांच्या हस्ते फुलझाडे लागवड करण्यात आली. कृषी अधिकारी प्रमिला आंभेरे यांनी संबंधित कामासाठी मार्गदर्शन केले. संबंधित महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत इतर लोकांपुढे आदर्श निर्माण केला असून आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

Previous articleदिवगी टी टी एस प्रा. लि. कंपनी तर्फे ससून कोविड रुग्णालयाला अल्ट्रा साऊंड मशीन भेट
Next articleराष्ट्रवादी कॉग्रेस चाकण शहर यांच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध