दिवगी टी टी एस प्रा. लि. कंपनी तर्फे ससून कोविड रुग्णालयाला अल्ट्रा साऊंड मशीन भेट

Ad 1

अक्षय भोगाडे,भोसरी- दिवगी टी टी एस प्रा. लि. कंपनी भोसरी तर्फे ससून कोविड रुग्णालयाला अल्ट्रा साऊंड मशीन ( Hitachi 2D Echo Machine) सुपुर्द करण्यात आले. कोरोना च्या या संकट काळात देश हितार्थ फुल ना फुलाची पाकळी म्हणून दिवगी टी टी एस चे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र दिवगी साहेब यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून ससून रुग्णालयाला ही मशीन सुपूर्त करण्यात आली.

यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. तांबे, डॉ. हरीश, डॉ. दसमित सिंघ यांच्यासमवेत कंपनीचे एच आर हेड गोपाल दळवी व पर्चेस हेड दीपक वाणी उपस्थित होते.