राष्ट्रवादी कॉग्रेस चाकण शहर यांच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

Ad 1

चाकण: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ चाकण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.तसेच पडळकर यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली.

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस चे चाकण शहर अध्यक्ष राम सुदाम गोरे ,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संध्या जाधव राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नाईकवाडी, चाकण नगरपरिषद विरोधी पक्षनेते जीवन दादा सोनवणे, अल्पसंख्यांक चाकण सेलचे अध्यक्ष मोबीन भाई काजी, उद्योजक विजू शेठ खरमाटे उपस्थित होते