राजगुरूनगर शहरातील जिजाऊंच्या लेकींनी चिमुरड्या मावळ्यांसाठी गॅलरीत बनवले किल्ले

बाबाजी पवळे,राजगुरूनगर- दिवाळीची चाहुल लागली कि बालचमुचीं लगबघ सुरु होते ती किल्ले बनवण्यासाठी दगड, माती, वीटा गोळा करायच्या आणि घरासमोरील अंगणात किल्ला बनवायचा.किल्ल्याला कलर लावायचा, किल्ल्यावर आणि आजुबाजुला हळीव टाकायची आणि चारपाच दिवसांनी किल्ला आणि परीसर हिरवागार व्हायचा. मग सैनिक आणायणे दिवे लावायचे फटाके फोडायचे तो एक वेगळाच आंनद असतो .

पण गेल्या काही वर्षात ग्रामीण भागतही उंच उंच इमारती उभ्या राहिल्या आणि अंगण ,मैदाने नाहिशे झाले असल्याने किल्ला कोठे करायचा हा प्रश्न मुलांसमोर उभा राहिला आहे ??? असाच प्रश्न राजगुरुनगर येथील सौभाग्य नगरी येथील लहानग्याला पडला असताना या प्रश्नावर राजगुरुनगर शहरातील सौभाग्य नगरी या सोसायटीमधील  जिजाऊच्यां लेकिनीं उत्तर शोधले आणि आपल्या लहान मावळ्यांसाठी चक्क ‌‌‌गॅलरीत किल्ला बनवायला सुरवात करून मुलांना किल्ला बनवण्यासाठी गॅलरी उपलब्ध करून दिले आहे.

या महिलांच्या निर्णयामुळे लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण झाले असून त्यांची किल्ला बनवण्याची लगबग सुरू झाली आ.हे मोबाईलवर व टिव्ही मध्ये डोके घालणारी मुले किल्ला बनवताना दिसल्याने त्यांचे कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. दिवाळीत किल्ला बनविण्याची मजा काही वेगळीच असते.

Previous articleवडिलांच्या डोळ्यासमोर १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
Next articleवेगरे’च्या सरपंच निवडीकडे सर्वांचे लक्ष ….ग्रामपंचायत सदस्य गेले देवदर्शनाला