नायफड येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक

Ad 1

राजगुरूनगर-तालुक्यातील नायफड येथे सोमवारी (दि.२ ) रोजी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून संसरोपयोगी वस्तू ,धान्य आदी ऐवज जळून खाक झाला. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.या घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

नायफड येथील खेमा रामजी तिटकारे यांच्या घराला सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला अचानक आग लागून घरातील अंदाजे रोख ३० हजार रुपये तसेच टिव्ही, कपाट ,संसारोपयोगी वस्तू, धान्याची पोती, कपडे, बी बियाणे, शेतीत लागणारे लहान-मोठी वापरात येणारी अवजारे, मुलांचे शालेय साहित्य इत्यादी जळून खाक झाले. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या दुर्घटनेमुळे तिटकारे कुटुंब अस्वस्थ झाले आहे.दानशुरांकडून त्यांना मदतीची गरज आहे.

आवाज जनतेचा न्यूज पोर्टलच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात येत असून मदतीसाठी खेमा रामा तिटकारे यांच्या ९४०३०६६१६९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा