पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणूक नवीन मतदार नोंदणी मोहीम

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे पदवीधर या मतदार संघामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे येतात.यासाठी या पाच जिल्ह्यातील रहिवासी असावा.भारतातील कोणत्याही विद्यापीठाची पदवी अथवा पदविका धारण केली व्यक्ती याची नोंदणी करू शकतो. नोंदणी करता तीन वर्षाचा डिप्लोमा सुद्धा चालतो. २०१६ च्या अगोदर ज्याची डिग्री पूर्ण झाली आहेत असे सर्व पदवीधर यासाठी नोंदणी करु शकतात. कोरोना संकटामुळे याची नोंदणी ऑनलाईन करावी लागेल.

नोंदणी करण्यासाठी खालील लिंक दिल्या आहेत कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर सुद्धा आपण हा फॉर्म भरु शकता यासाठी आपणाकडे मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट, पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरु शकता त्याचबरोबर आयडेंटी कार्ड फोटो या गोष्टी नोंदणी करण्यासाठी लागतील.

पुणे पदवीधर मतदार यादी मध्ये नाव लावण्यासाठी खालील लिंक वापरा
https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
तसेच ज्यांनी नोंदणी केली आहे अशांनी आपलं नाव यादीमध्ये आहे का यासाठी खालील लिंकचा वापर करावा व हा मेसेज आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहोचवावा व मतदार नोंदणी करिता मनापासूनचा प्रयत्न करावा ही विनंती
https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी माध्यमाशी बोलताना माहिती दिली.

Previous articleमराठा आरक्षण संदर्भात मराठा संघटनाची सातारा येथे गोलमेज परिषद पार
Next articleनायफड येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक