सभापती भगवान पोखरकर यांनी मुलाच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून वाकळवाडी शाळेला संगणक दिले भेट

राजगुरूनगर-खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वायफळ खर्च टाळून, समाजाचे काही देणे लागतो या विचाराने वाकळवाडी येथील ठाकर वस्तीतील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेला संगणक भेट दिले आहे.

वाकळवाडी (ठाकरवस्ती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खिडकीचे गज कापून शाळेतील संगणक चोरून नेण्याचा प्रकार ( दि.२८ ) रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता. त्यानंतर या शाळेला खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांनी भेट देत पाहणी केली होती. पाहणी केल्यानंतर त्यांनी मुलांच्या शिक्षणा मध्ये अडचण येऊ नव्हे म्हणून शाळेला दोन संगणक भेट दिले आहेत.

वाकळवाडी (ठाकर वस्ती ) येथील शाळेतील खिडकीचे गज कापून संगणक चोरी झाल्याची घटना घडली असताना याबाबतची सविस्तर बातमी आवाज जनतेचा या न्युज पोर्टलने लावल्यानंतर या बातमीची दखल घेत सभापती भगवान पोखरकर यांनी या शाळेला भेट दिली होती. भेट दिल्यानंतर मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सभापती यांनी ताबडतोब या शाळेला दोन संगणक भेट दिले आहे .आपला मुलगा संस्कार (वय.१३) यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता एक संगणक दिला असून दुसरा संगणक पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना मुलांना ऑनलाईन माध्यमातून शिकवले जाते त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने त्यांनी हे संगणक उपलब्ध केले आहेत घटना घडली असताना तीन-चार दिवसातच त्यांनी संगणक उपलब्ध करून दिल्याने त्यांचे नागरिक व सर्व शिक्षक यांनी आभार मानले आहेत.

Previous articleवाडा रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवा अन्यथा खळखट्याळ आंदोलनाचा मनसेचा इशारा
Next articleमराठा आरक्षण संदर्भात मराठा संघटनाची सातारा येथे गोलमेज परिषद पार