मराठा आरक्षण संदर्भात मराठा संघटनाची सातारा येथे गोलमेज परिषद पार

मराठा आरक्षण संघर्ष समिती, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा यांची विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद राजधानी सातारा येथे पार पडली.

या परिषदेत सहा ठराव मंजूर करण्यात आले. मराठा आरक्षणावरील मा. सुप्रीम कोर्टातील स्थगीती त्वरित ऊठवावी, आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत नोकर भरती स्थगीत करावी,अतिवृष्टी झाल्याने सर्व शेतकऱ्यांचे विजबील माफ करावे, आंदोलनाची तिव्रता वाढवत खासदार आमदार लोकप्रतिनिधींना घेराव घालणार.
मा. आ. छत्रपती शिवेंद्रसिहंराजे भोसले यांनी सखोल असे मार्गदर्शन करत मराठा समाजाला एकत्र येऊन परत लढा उभारावा लागेल जेणेकरून परत मराठ्यांचे पानिपत होणार नाही.

या प्रसंगी मा.सुरेश दादा पाटील,मा. विजयसिहं राजे महाडिक व छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेशाध्यक्षा रूपालीताई राक्षे पाटील, संभाजी सेनेचे सुधाकरराव माने यांच्यासह सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसभापती भगवान पोखरकर यांनी मुलाच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून वाकळवाडी शाळेला संगणक दिले भेट
Next articleपुणे पदवीधर विधानपरिषद निवडणूक नवीन मतदार नोंदणी मोहीम