वाडा रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवा अन्यथा खळखट्याळ आंदोलनाचा मनसेचा इशारा

राजगुरूनगर-शहरातील वाडा रोडवर पुणे हायवे ते प्रांत ऑफिस पर्यंत नेहमी अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते त्यावर तोडगा काढावा तसेच अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात यावी.यासाठी मनसेचे जिल्हा अध्यक्ष समिर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली प्रातंधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

राजगुरूनगर शहरातील वाडारोड वरील जुना मोटार स्टँड ते पाण्याची टाकी या भिमाशंकर महामार्गावर राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीमध्ये मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून या रस्त्यावरून जाताना ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर होणारे चुकीच्या पद्धतीने वाहनांची पार्किंग व नगरपरिषद हद्दीत झालेले अतिक्रमण ही वाहतूक कोंडीची कारणे असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून अवैधरित्या पार्किंग करणाऱ्यांवर नगरपरिषद कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई  करावी अन्यथा खळखट्याळ आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष समिर थिगळे यांनी दिला आहे.

संबंधित प्रशासन अधिकारी यांनी या मध्ये जातीने लक्ष घालून पोलिस यंत्रणा, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, व्यापारी वर्ग, विविध पक्ष प्रमुख, सामाजिक संघटना या एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढावा व नागरिकांची या कोंडीतून सुटका करावी अशी विनंती ती मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात या वाहतूक कोंडीवर तोडगा न निघाल्यास जनहितासाठी आंदोलन केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत ,तालुकाध्यक्ष संदिप पवार, सचिव नितीन ताठे, शहर अध्यक्ष सोपानराव डुंबरे, चाकण शहर अध्यक्ष ऋषिकेश वाव्हाळ, अजय तापकीर,प्रमोद शिंदे, तालुका उपाध्यक्ष संतोष ढेरंगे, सनी दौंडकर ,शुभम स्वामी, सुजित थिगळे, नवनाथ देवकर, संदेश पवार, कुणाल कोल्हापूरे, सलिमभाई शेख ,गोपिनाथ पवार, सागर बुर्डे मंगेश कुबडे, केशव पाचपिले सह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.

Previous articleवारूळवाडी येथून २२ वर्षीय विवाहिता दहा दिवसांपासून बेपत्ता
Next articleसभापती भगवान पोखरकर यांनी मुलाच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून वाकळवाडी शाळेला संगणक दिले भेट