मनसेचा दणका- खेड मधील केटीईएस या शाळेकडून फी मध्ये सवलत

राजगुरूनगर-राजगुरूनगर शहरातील केटीईएस या शाळेकडून अवास्तव फी आकारली जात असल्याची तक्रार पालकांनी खेड तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती त्यांनंतर मनसेने शाळेला पत्र दिले होते.

त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापणाकडून बैठक घेऊन यावर्षी फी मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमागे 325 रुपये फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे पत्र काल शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका अनिता गुजराथी यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे जिल्हा, उपाध्यक्ष मनोज खराबी मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, तालुका अध्यक्ष संदीप पवार ,तालुका सचिव नितीन ताठे, शहर अध्यक्ष सोपान डुंबरे व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकहू गावच्या आपत्तीग्रस्त कुटुंबाचे लोकप्रतिनिधीनी भेट घेऊन केले सांत्वन
Next articleसीमोल्लंघन ‘कोरोनामुक्ती’चे करुया संकल्प — निखिल कांचन