सीमोल्लंघन ‘कोरोनामुक्ती’चे करुया संकल्प — निखिल कांचन

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपायांचा सध्या अवलंब करावा लागेल.

हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या प्रश्नांनी जगातल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय. सरकारद्वारे सक्ती करून नव्हे, तर स्वेच्छा जनसहभागाद्वारे कोरोनामुक्तीचा लढा लढला गेला तरच ती खऱ्या विजयश्री आणि खऱ्या अर्थाने कोरोनामुक्तीचे ‘सीमोल्लंघन ‘ ठरेल. दसऱ्याच्या निमित्ताने सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी असे मत उद्योजक निखिलभैया कांचन यांनी सांगितले.