वेश्या व्यवसाय चालवत असलेल्या सह्याद्री लॉजवर पोलिसांची कारवाई

नारायणगाव (किरण वाजगे)

बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या जुन्नर तालुक्यातील कारखाना फाटा येथील एका लॉजवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून लॉजचा मॅनेजर प्रवीण राम जाधव याला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

धनगरवाडी, कारखाना फाटा येथील सह्याद्री लॉज वर वेश्याव्यवसाय चालु असल्याबाबत नारायणगाव पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांना सह्याद्री लॉज वर वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत माहिती दिली.त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सह्याद्री लॉज वर बनावट गिराईक, पोलीस व पंच यांना मार्गदर्शन करून छापा कारवाई साठी पाठवले.

त्यानुसार सह्याद्री लॉजवर बनावट ग्राहक बनून गेलेल्या इसमाने वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली त्याप्रमाणे सह्याद्री लॉज चे मॅनेजर प्रवीण राम जाधव यांनी वेश्या आगमनासाठी महिला पुरवून बनावट गिराईका कडून एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली. याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी शिताफीने वेश्या व्यवसाय करणाऱ्या पीडित महिलेला व लाँजचा मॅनेजर प्रवीण जाधव यांना छापा टाकून ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपी प्रवीण राम जाधव याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कस्टडी ठोठावली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के व नारायणगाव पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड हे करीत आहेत.

Previous articleसीमोल्लंघन ‘कोरोनामुक्ती’चे करुया संकल्प — निखिल कांचन
Next articleअल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या दोघांना नारायगाव पोलिसांकडून अटक