वाकळवाडीत “माझे कुटुंब माझी” जबाबदारी योजनेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी

राजगुरूनगर- “माझे कुटुंब माझी जबाबदारी” योजनेअंतर्गत ग्रामपंचायत वाकळवाडी येथे नागरिकांची तपासणी करण्यात आली.

येथील २२८ कुटुंबातील ४८६ नागरिकांची कोरोना तपासणी आरोग्य पथकाकडून करण्यात आली.यावेळी तपासणीत कुणीही संशयीत रुग्ण आढळून आले नसल्याचे ग्रामसेविका अनिता अमराळे यांनी सांगितले.

यावेळी ग्रामसेविका अनिता अमराळे, केंद्र प्रमुख बाळासाहेब गावडे,शिक्षक रेटवडे गुरूजी, हनुमंत पवळे, अंगणवाडी सेविका शांताबाई पवळे, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी काळूराम भंडलकर उपस्थित होते.

Previous articleमाझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत कोयाळी तर्फे वाडा येथे आरोग्य तपासणी
Next articleकोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा इतिहास लिहिण्या सारखा- विशाल भोसले