कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा इतिहास लिहिण्या सारखा- विशाल भोसले

अमोल भोसले,उरुळी कांचन

आज कोरोनाच्या वैश्विक महामारीत अनेक कुटुंब अडचणीत सापडली आहेत, उद्योग व्यवसाय शेतकरी बांधव चोहोबाजूंनी अडचणीत सापडले आहे. माणसाच्या मनात संवेदनशीलता यानिमित्ताने तयार होणं आवश्यक होत त्यातही काही मोजक्या लोकांनी सेवाभावी संस्थेने आपलं सर्वस्व पणाला लावून अडचणीत असलेल्या बांधवाना मदतही केली.

राज्य सरकार, प्रशासन, आरोग्य विभाग, गृह विभाग, महसूल विभाग, महावितरण, आशा वर्कस, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, डॉक्टर, सेवाभावी सामाजिक संस्था या सर्वानी योग्य समन्वयक ठेवून कोरोना महामारीत केलेल्या कार्याचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला जाण्यासारखे महान काम घडले आहे यांची दखल भविष्यात सर्वानी ठेवून स्वतः हा काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागाचे हवेली तालुका अध्यक्ष विशाल भोसले यांनी व्यक्त केले.

सामाजिक जाणिव ठेवून विशाल शिवाजी भोसले यांनी हवेली तालुका पत्रकार संघाच्या बांधवांना तसेच कोरेगावमुळ ग्रामपंचायत कर्मचारी यांना N -95 मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी वरील मनोगत भोसले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कोरेगावमुळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Previous articleवाकळवाडीत “माझे कुटुंब माझी” जबाबदारी योजनेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी
Next articleरूपाली राक्षे यांचा “मी भारतीय -कोविड योध्दा” राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारांने गौरव