माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत कोयाळी तर्फे वाडा येथे आरोग्य तपासणी

Ad 1

राजगुरूनगर- माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कोयाळी तर्फे वाडा येथे नागरिकांची तपासणी करण्यात आली.

कहू व कोयाळी येथील ११० कुटुंबातील ५२४ नागरिकांची कोरोना तपासणी आरोग्य पथकाकडून करण्यात आली.यावेळी तपासणीत कुणीही संशयीत रुग्ण आढळून आले नसल्याचे ग्रामसेविका मोनिका गुंजाळ यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच संतोष दाते पा. ग्रामसेविका मोनिका गुंजाळ, पोलीस पाटील अनिल दाते,आशा सेविका वर्षा सुपे,गणपत वाढणें, निखिल दाते,सुनील वाघ, केंद्रप्रमुख सांगाडे सर उपस्थित होते.

आरोग्य पथकात दत्तात्रय मेमाणे,मनीषा वाघोले,मेघा पवळे,सुनीता नाइकडे,स्मिता गोडांम्बे,खेडकर दत्तात्रय यांनी काम पाहिले.