माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत खरपूड व म्हसेवाडी गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी

Ad 1

राजगुरूनगर-माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत खरपुड तर्फे गावातील कुडे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने व जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक ,आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक ,आशा वर्कर ,यांच्या मार्फत खरपुड व म्हसेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी सुमारे 113 कुटुंबातील 517 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या आरोग्य तपासणीत गावातील एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही.

या मोहिमेत सरपंच यमुना मदगे, उपसरपंच बाळू मदगे ,ग्रामसेवक सुरेश घनवट, शिक्षक आर. के .रामाने ,आर.ए.फुलवरे, एस. बी. पारधी, एस. जी. मरसाल,व्ही. एम.जावळे ,टी. पी.जाधव ,आर.बी. नरसाळे वैद्यकीय अधिकारी व्ही. एन.खटके, आरोग्यसेविका एस. बी.चव्हाण,सी. एच. ओ. एन. एस.कुंगने,एस. जी.बहिरट, नंदा सुपे, नकोशा मदगे, सविता भोकटे, मंजुळा मदगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले