शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे (५५ ) यांचे निधन झाले. यांच्यावर गेल्या २५ दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ आणि आई असा परिवार आहे. गोरे यांनी चाकण विधान परिषदे गटाचे सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. २०१४ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोरे यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून १ लाख ०३ हजार २०७ मते घेत विजय मिळवला होता.

Previous articleमाझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत खरपूड व म्हसेवाडी गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी
Next articleसुरेश गोरे यांना दौंड चे आमदार राहुल कुल यांनी वाहिली श्रद्धांजली