भीमा पाटसचा गळीत हंगाम सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या आंदोलन

सचिन आव्हाड

दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. मधुकरनगर पाटसचा गळीत हंगाम २०२०-२०२१ पुर्ण क्षमतेने चालु करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार दि. 11 ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे . अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे .

दौंड तालुक्यामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे . भीमा सहकारी कारखान्याचा चालू हंगाम सुरू करण्याबाबत व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारे हालचाली दिसत नाहीत. इतर कारखाने येत्या काही दिवसातच सुरू होतायत. तालुक्यातील शेतकरी सभासदांचा ऊस गाळप होण्यासाठी भीमा पाटस सहकारी साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात
यावा.

तसेच कामगारांची थकीत पगाराची देणी ताबडतोक देण्यात यावीत. शेतकरी सभासदांचे एफ.आर.पी.ची ठेवीमध्ये वर्ग केलेली रक्कमताबडतोष देण्यात यावी. या मागणीसाठी रविवार दि .११.१०.२०२० रोजी सकाळी १०.३० वा कारखाना (मधुकरनगर पाटस) कार्यस्थळावर आंदोलन करूण निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतींने दौंड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे .

Previous articleनॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस तर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध
Next articleमाझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत खरपूड व म्हसेवाडी गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी