नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस तर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध

Ad 1

दिनेश पवार,दौंड

उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे 19 वर्षीय दलीत तरूणी वरती झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा दौंड येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ)तर्फे दौंड तहसीलदार, दौंड पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून निषेध करण्यात आला.

सदर घटनेचा तपास जलद करावा,यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय दबाव तंत्र येऊ नये,दोषींना फ़ाशी ची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे, तसेच पीडित कुटुंबावरती दबाव,धमकी स्थानिक संबंधित देत आहेत त्यामुळे हे कुटूंबीय भयभीत असून त्यांना योग्य न्याय लवकरात लवकर मिळवून द्यावा यावेळी पुणे जिल्हा निरीक्षक पांडुरंग गडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना तिव्र निषेध व्यक्त केला तसेच लोकशाही प्रधान देशात,असे प्रकार होणे ही फार गंभीर बाब आहे,असे प्रकार करणाऱ्या वर वेळीच कठोर शिक्षा व्हावी असे मत व्यक्त केले, व अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावरती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब जाधव,पुणे जिल्हा निरीक्षक पांडुरंग गडेकर,अमर जोगदंड,सूरज वाघमारे,प्रकाश पारदासनी,गब्बर वाल्मिकी,तमा पलीम,प्रकाश सोनवणे,निलेश जगताप,गणेश ससाणे,किरण खुडे यांच्या सह्या आहेत