ग्रामपंचायत काळुस तर्फे कोरोनायोध्द्यांचा सन्मान व महिला बचत गटांना मसाला गिरणी व शेवई यंत्रांचे वाटप

चाकण- ग्रामपंचायत काळुस या़ंच्यावतीने काळुस गावातील आरोग्य विभाग डाँक्टर कर्मचारी , तलाठी , प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक ,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस,ग्रामपंचायत कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी विद्युत कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.खेड तालुक्याचे भुषण,जिल्हा परीषद पुणे विद्यमान अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या शुभहस्ते सर्वांचा सन्मान सोहळा पारा पडला.

सन२०१५-२०२०या कालावधीत काळुस ग्रामपंचायतचा उत्कृष्ट कारभार पाहिल्याबद्दल विद्यमान सरपंच योगेशशेठ आरगडे,उपसरपंच विमलताई वाटेकर व सर्व मा . सरपंच मा.उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

आपला गाव कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आंसारीक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्या संपूर्ण गावाला वाटप केल्या.ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाला अशा ठिकाणी विलगीकरण करून सॅनिटायझर हॅन्ड वॉश संपूर्ण गावाला घरपोच वाटले,स्प्रे पंपने गावाची अनेक वेळा फवारणी केली. नागरिकांना आधार देऊन लोकांचे आरोग्य जपण्याचे काम ग्रामपंचायतचे सरपंच , योगेशशेठ आरगडे, गणेश पवळे,यशवंत खैरे, पवन जाचक , मोहन पवळे सरपंच व प्रशासनाने केले म्हणून काळुस ग्रामपंचायत चे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी कामाचे कौतुक केले. गावांमध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी महत्त्वाची अशी अनेक कामे करण्याचा यथोचित असा प्रयत्न आजी-माजी सरपंचांनी केलेला आहे.विकास कामाबरोबरच शिक्षण याकडेही विशेष प्रयत्न म्हणजे सन २०१९/२० या शैक्षणिक वर्षात गुणवत्तापुर्ण शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल नवचैतन्य महाविद्यालय व न्यु इंग्लिश स्कुल काळुस यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सन २०१९/२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता १०वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

महीला सबलणीकरणासाठी मा.सरपंच गणेशशेठ पवळे व मा.उपसरपंच सौ मंगलताई भगवान पोटवडे व मा.उपसरपंच सौ.रूपालीताई संतोषशेठ खैरे यांच्या संकल्पनेतुन महीला बचत गटांना मसाला गिरणी व शेवई यंत्र वाटप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

“कोरोना योध्दा सन्मान ही संकल्पना राबविणारी काळुस ग्रामपंचायत ही पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असुन त्यांच्या या आदर्श कामाची दखल नक्कीच जिल्हा पातळीवर घेतली जाईल “अशी ग्वाही अध्यक्ष ताईंनी दिली.जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे असे आव्हान आध्यक्ष ताईंनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.सरपंच मोहन सर,पवळे पाटील यांनी केले.आभार संतोष कुंभार सर यांनी मानले.

Previous articleखेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन
Next article“शिव ज्योत परिवार ” यांनी प्राचीन शिलाहार काळातील मंदिराचे केले संवर्धन