“शिव ज्योत परिवार ” यांनी प्राचीन शिलाहार काळातील मंदिराचे केले संवर्धन

भिवंडी- शिलाहार काळातील शिव मंदिराची प्रथम संवर्धन मोहीम ” शिव ज्योत परिवार महाराष्ट्र राज्य” यांनी ४ ऑक्टोंबर २०२० रविवार रोजी आयोजीत केली होती. या मोहिमेत एकूण ७५ शिव प्रेमि इतिहास प्रेमी यांनी सहभाग घेऊन उत्तम असे संवर्धनाचे कार्य केले.

पालघर मधील पारोळ येथील तुंगार अभय अरण्य च्या जंगलाच्या कुशीत शिलाहार कालीन राज्यांच्या पैकी सोमेश्वर या राज्याने बांधलेलं हे एक प्राचीन हेमाडपंथी बांधणीतील शिव मंदिर. या मंदिराची काळाच्या ओघात पूर्ण पणे पडझड झाली असून ते थोडया फार प्रमाणात आपले कसे बसे अस्तित्व टिकून आहे.विशेष म्हणजे या मंदिरात आता शिव पिंड नाही आहे. गावकऱ्याच्या मता नुसार मंदिरातील शिव पिंडीचे काही अडाणी लोकांनी पिंडी खाली धन आहे असं माणून पिंड काढून बाहेर फेकून दिली होती.

नाल्याचा प्रवाह पावसाळ्यात जास्त असल्याने ती पिंड व मंदिराचे बरेच अवशेष वाहत गेली असून, ज्या ठिकाणी ती लागली त्याच ठिकाणी त्या पिंडीला काडून तिची स्थापना केली आहे.भिवंडी मधील डुंगे गावातील व इतर पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन नवनिर्मित शिव ज्योत परिवाराने जगाला माहिती नसलेल्या आणि अपरिचित अश्या मंदिराचे संवर्धन करून समाजाला दाखवून दिले आहे की अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. परिवाराने प्राचीन शिव पिंड असलेल्या मंदिरात त्याचे महत्व लक्षात घेऊन अभिषेक पूजा करून साहित्य पूजन केले. त्यानंतर परिवाराचे मार्गदर्शक व अपरिचित इतिहास अभ्यासक जयकांत शिंक्रे यानी त्या मंदिराचा पूर्ण इतिहास सांगितला गेला नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन कार्य करण्यात आले. शिवज्योत परिवाराने आपलं अस्तित्व संवर्धन कार्यची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श करून दाखवल आहे.

या मोहिमेत इतरही काही ग्रुपने सहभाग घेतला होता. त्या पैकी राजे ग्रुप, छावा ग्रुप, किल्ले कारी ग्रुप, एस के ग्रुप, दुर्ग मावळा ग्रुप, राजा शिव शत्रपती परिवार, तसेच वन विभाग व स्थानिक ग्राम पंचायत चांगले मार्गदर्शन या मोहिमे साठी केले आणि इतर शिव प्रेमी इतिहास प्रेमी यांनी एकत्र येऊन मोलाची कामगिरी केली.

Previous articleग्रामपंचायत काळुस तर्फे कोरोनायोध्द्यांचा सन्मान व महिला बचत गटांना मसाला गिरणी व शेवई यंत्रांचे वाटप
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन