जरेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

राजगुरूनगर- जरेवाडी (ता खेड ) येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दोन किलोमीटर अंतराचा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच या रस्त्यावरून होणारी जड वाहतूक थांबवावी अशी मागणी जरेवाडी ग्रामस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे.

  जरेवाडी या २ किमी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ७.८३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे काम नुकतेच करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर आता मोठं मोठे खड्डे पडले आहेत. नव्याने केलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने हे काम निकृष्ट झाले,नव्याने करण्यात आलेला रस्ता उखडला असून तो दुरुस्त करावा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कामाचा दर्जा व्यवस्थितपणे राखला गेला नाही. या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती हमी साठी ठेकेदाराला १० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत आहे. मात्र काम केल्यानंतर काही दिवसांत हा रस्ता पुर्णपुणे उखडला आहे. डांबर व खडी रस्त्यावर पसरली आहे. ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. राधिका कन्स्ट्रक्शन पुणे यांनी या रस्त्याचे काम केले आहे. पुर्व भागातील जरेवाडी या परिसरात दगडखाणी आहेत. अवजड वाहनातून खडी क्रशरची वाहतुक या रस्त्यावरुन होत आहे.

त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे. रस्ता उखडून त्यात मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर निकृष्ट दर्जाचे वापरले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.२ किलोमीटरचा हा रस्ता असून तो तयार केल्यानंतर काही महिन्यातच खराब झाला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून त्याची तात्कळ चौकशी करावी, या रस्त्याची पुन्हा दुरुती करावी रस्त्यावरून होणाऱ्या जड वाहनांना बंदी करावी अशी मागणी जरेवाडी ग्रामस्थानी केली आहे. रस्ता तात्काळ दुसुरु न झाला तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करुन सार्वजनिक बांधकाम विभागला निवेदन दिले आहे

Previous articleराजगुरूनगर मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
Next articleखेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन