राजगुरूनगर मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

राजगुरूनगर – आठ महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या पतीने चारित्र्याच्या संशयातुन पत्नीचा तिच्याच ओढणीने गळा आवळुन खुन केला.खुन केल्यावर पत्नी बेशुद्ध पडल्याने स्वतः बेशुद्ध होण्याचे नाटक करून बनाव रचणाऱ्या पतीची पोलिसानी उलट चौकशी घेतली असता, खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे

रविवारी ( दि ४ ) रोजी तिन्हेवाडी रोड राजगुरुनगर  येथे एका विवाहित महिलेची आत्महत्या केली असे जाहीर झाले होते. मात्र खेड पोलिसांना सशंय व्यक्त करित आधिक तपास केला असता पतीनेच पत्नी हत्या केली असल्याचे सिध्द झाले आहे.पतीने याबाबत हत्या केल्याचे पोलिसासमोर कबुली दिली आहे.

पुजा पप्पु चव्हाण, (वय २० ) असे मयत विवाहितेचे नाव असुन  पप्पु  रामपुजागर चव्हाण, वय २१ ,रा तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर (मुळ रा लोनियाडीह, सीताराम पुर ग्रीन्ट, जि गोल्ड,उत्तर प्रदेश) असे आरोपी पतीचे नाव आहे.आरोपी पप्पु चव्हाण याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपी पप्पु हा लोनिया जमातीतला तर पुजा ही यादव जमातीची.पप्पु हा पीओपी कारागीर म्हणून काम करीत होता. दोन महिन्यापूर्वी राजगुरूनगर येथील दाजी सुभाष चव्हाण यांच्याकडे काम करून भाड्याने खोली घेऊन रहात होते.चारित्र्याच्या संशयातून त्यांचे एकमेकांशी वाद होत होते.रविवारी दुपारी असाच वाद होऊन त्याने ओढणीने गळा आवळून पत्नी पुजा हीचा खुन केला.खुन केल्यावर याच्याशी आपला काहीच संबंध नाही असा आव आणुन त्याने दुपारी कामावरून आल्यावर पत्नी बेशुद्धावस्थेत पाहिल्याने बेशुद्ध होण्याचे नाटक केले. गळ्याभोवती अवळलेली ओढणी सुती असल्याने कोणत्याही प्रकारची जखम,व्रण नव्हता. शवविच्छेदन अहवाल आल्यावर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुन केल्याची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख अधिक तपास करीत आहेत.

Previous articleफेसबुकवर पत्नीच्या नावाने बनावट अकाउंट बनवून पतीने केली पत्नीची बदनामी
Next articleजरेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे