मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देईन-आमदार दिलीप मोहिते पाटील

Ad 1

राजगुरुनगर : मराठा आरक्षण मिळण्यासाठी  आमदारकीचा राजीनामा देईन मी मराठा क्रांती मोर्चा सोबत आहे. असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी राजगुरूनगर येथे केले. खेड तालुका सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी मराठा क्रांती मोचार्चे वामन बाजारे, मनोहर बाडेकर, अमित टाकळकर, प्रमोद वाडेकर, रुपाली राक्षे, चेतन शेटे, विठ्ठल पाचारणे, विजय गोकुळे, अक्षता कान्हुरकर, अशोक मांडेकर, सौरभ दौंडकर आदींसह मराठा क्रांती मोर्चा सदस्य उपस्थित होते. त्यांनी आमदार दिलीप मोहिते याना निवेदन दिले.

माहिते-पाटील म्हणाले की,चाकण मराठा मोर्चा आंदोलनाची सर्वाधिक किंमत मला मोजावी लागली आहे. माज्यावर खोटा गुन्हा दाखल केला. गुन्हा अशा पद्धतीचा दाखल केला ज्यांचा काहीच संबंध नाही मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला.मला दंगलीचा सूत्रधार बनवले. पुढे आंदोलकांना त्रास झाला नाही मला मात्र कित्येक महिने त्रास सहन करावा लागला. त्याची मोठी किंमत मोजावी लागली.

यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई मोहिते, अरुण चांभारे, मनीषा सांडभोर, कैलास सांडभोर, सुभाष होले, सुजाता पचपिंड, सुनील थिगळे, वैशाली सांडभोर आदी उपस्थित होते.