खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाने केले आक्रोश आंदोलन

Ad 1

राजगुरूनगर-खेड तालुका मराठा बांधव भगिनीनी एकत्र येऊन राजगुरुनगर येथील आमदार दिलीप मोहिते पाटिल यांच्या तिन्हेवाडी रोडवरील कार्यालयासमोर आंदोलन करुन आमदार मोहिते पाटिल यांना निवेदन दिले.

मराठा क्रांती मोर्चाने राज्यात सर्वत्र लोकप्रतिनिधी च्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याची भुमिका घेतली होती खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे आमदार मोहिते यांच्या राहात्या निवासस्थान परीसरात कंटेनमेंट झोन असल्याने निवासस्थाना ऐवजी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय गेल्या २२ सप्टेबर रोजी घेण्यात आला.यावेळी तिन्हेवाडी आणि पंचायत समिती परीसरात मोठा पोलिस बंदोबस्त दिवसभर ठेवण्यात आला असताना .मराठा सकलजनांनी हे आंदोलन केले नव्हते. अखेर महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या २ आक्टोबर या जयंती निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन करण्याचे जाहिर केले. याबाबत पोलिसांनी ५० कार्यकर्ते नी आंदोलन करण्यास परवानगी दिली.मात्र या मागिल काळात खेड तालुक्यात झालेल्या मराठी क्रांती मोर्चाला तालुक्यात हिसंक वळण लागले होते.यावेळीही कोणताही अनुचित प्रकार होऊ नये साठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.

आज सकाळी ११ वाजता मराठा बांधवानी एकत्र येऊन आमदार मोहिते यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करुन मराठा बांधवाना आरक्षणासह यापूर्वी लागु असलेल्या सवलती देण्यात याव्यात आदि मागण्या करुन घोषणा दिल्या.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाला आमदार मोहिते सामोरे जाऊन निवेदन देत मार्गदर्शन केले.यावेळी मोहिते पाटिल म्हणाले की मी यापुर्वी स्वतः मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालो होतो मात्र मला त्याची मोठी किमंत मोजावी लागली.माझ्यावर गुन्हा दाखल करुन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अटक करण्याचा प्रयत्न केला होता.मी तुमच्याबरोबर असुन वेळप्रसंगी आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा बांधवासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची माझी तयारी आहे.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिस निरीक्षक सतीश गुरव आदिसह राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, अरुण चांभारे, सुरेखाताई मोहिते,सभापती विनायक घुमटकर,सुनील थिगळे, सुभाष होले आदि उपस्थित होते.

या आंदोलनात मनोहर वाडेकर, वामन बाजारे, चेतन शेटे, विठ्ठल पाचारणे, सौरभ दौंडकर, अक्षता कान्हूरकर, अँड. प्रमोद वाडेकर, रुपाली राक्षे, डॉ. विजय गोकुळे, अमित टाकळकर. आदिसह मराठा बांधवानी सहभाग घेऊन आंदोलन करुन मागण्या मांडल्या.