गजानन जेष्ठ नागरिक संघातील सदस्यांनी ऑनलाइन मिटिंगचा घेतला आनंद

दिनेश पवार,दौंड

एकदा आयुष्याची साठी ओलंडली की माणूस निवृत्त होतो मग ती नोकरी असो,संसार असो की इतर काही असो,मग काय पुढे देवाचे नामस्मरण, जेष्ठ नागरिक संघात जावून गप्पा, गोष्टी, यात वेळ घालवायचा नि मग घरी येऊन नातवंडा बरोबर, घरातील मंडळींबरोबर वेळ घालवायचा परंतु सध्या आता तेही राहिले नाही कारण सध्या ‌सर्वत्र कोरोना परिस्थिती मुळे भयावह वातावरण निर्माण झाले आहे, यामुळे कोणी कुणाला भेटू शकत नाही, एकत्र येऊन गप्पा मारू शकत नाही, सर्वत्र उदास मानसिकता निर्माण झाली आहे.

परंतु अशाही परिस्थितीत या जेष्ठ मंडळींनी हायटेक व्हायचे ठरवले अर्चना साने यांच्या संकल्पनेतून आपल्या सहकाऱ्यांना भेटायचे ठरवले तेही ऑनलाइन मिटिंग घेऊन पण आधुनिक तंत्रज्ञानाची फारशी बऱ्याच जणांना ओळख नसल्याने ते शक्य कसे होईल हाच सर्वांपुढे प्रश्न निर्माण झाला, मग यांच्यासाठी क्रिएटिव्ह कम्प्युटर च्या अर्चना मिसाळ यांनी मदत केली नि अथक परिश्रम घेऊन सर्वांनी ही तांत्रिक बाब समजून घेतली. गजानन जेष्ठ नागरिक संघातील सदस्यांनी 1ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने झुम ऐप वरती एकमेकांशी संवाद साधला,मिटिंग ची सुरुवात राष्ट्र गीताने होऊन सांगता पसायदानाने झाली, सर्वांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला नि हरवलेले क्षण पुन्हा सापडले,यात संघाचे अध्यक्ष दत्ताजी शेणोलीकर यांनी सर्वांना काळजी घ्यावी असे आवाहन केले.

शाम वाघमारे यांनी पुढील नियोजन कसे असेल याबाबत चर्चा केली, तर अर्चना साने यांनी नवीन उपक्रमाची माहिती दिली सर्वांनी मनमोकळ्या पणाने आपली मनोगते व्यक्त केली.यामध्ये सुधाकर जोगळेकर, प्रभाकर गुमास्ते,सुचित्रा चौधरी आदींनी सहभाग घेतला.

Previous articleचांडोली,चाकण,आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयांना आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकांचे लोकार्पण
Next articleमराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देईन-आमदार दिलीप मोहिते पाटील