चांडोली,चाकण,आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयांना आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राजगुरूनगर-कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयांना खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज (दि.२) रोजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आमदार स्थानिक विकास निधी सन २०२०-२१ मधून चांडोली, चाकण व आळंदी या तीन ग्रामीण रुग्णालयांची गरज लक्षात घेऊन या तीनही ग्रामीण रुग्णालयांना रुग्णवाहिका लोकार्पण केल्या. तसेच आवश्यक असलेले मेडिकल साहित्य पीपीई कीट, सॅनिटायझर,थर्मल गन,ऑक्सिमीटर,मास्क,सोडीयम हायपोक्लोराईड इ. वस्तूंचे वाटप केले.

या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी सुरेखाताई मोहिते पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे सभापती विनायक घुमटकर,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,अरुणशेठ चांभारे मा.सभापती,कृषी व पशुसंवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेस रा.शहर अध्यक्ष सुभाष होले,राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा मनीषाताई सांडभोर,ॲड सौ.मनीषाताई टाकळकर, दक्षता समिती सदस्य खेड,उपसरपंच वरुडे आशाताई तांबे,जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.कनकवले, डॉ.मुंडे, डॉ.जाधव आदी उपस्थित होते.

Previous articleबापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मास्क वाटप
Next articleगजानन जेष्ठ नागरिक संघातील सदस्यांनी ऑनलाइन मिटिंगचा घेतला आनंद