१०० वर्षांपूर्वीच्या आदिवासी ठाकर वस्तीला अखेर शासनाकडून न्याय

चाकण- कडाचीवाडी आणि मेदनकरवाडी गावाच्या सीमेवर वन विभागाच्या जागेत शंभर वर्षांपूर्वीची आदिवासी ठाकर वस्ती वसलेली आहे त्यांना सन २०१७ मध्ये चाकण वनविभाग ने अतिक्रमण काडण्यासाठी नोटीस दिल्या होत्या, सात दिवसाच्या आत घरे न हटविल्यास वनविभाग कारवाई करेल आसा इशारा देण्यात आला होता.त्यामुळे ठाकर समाज चिंताग्रस्त व भयभीत झाला होता.

आदिवासी ठाकर युवा युवती प्रतिष्ठान व आदिवासी नोकरवर्ग संस्था तसेच आदिवासी कृती समिती व स्थानिक राजकीय पुढारी यांनी जिल्हाधिकारी व वनविभाग यांच्याकडे योग्य पाठपुरावा करून त्या ठाकर वस्तीला अखेर न्याय मिळवून दिला.पाठपुरावा करून ठाकर वस्तीला न्याय मिळवून देण्यासाठी सिताराम जोशी,नरेंद्र केदारी,रितेश शिंदे,पांडुरंग कडाले,गोरक्षनाथ केदारी यांनी विशेष प्रयत्न केले.

खेड तालुक्यातील ज्या ठिकाणी वस्त्या वनविभागात आहेत व इतरही तालुक्यातील वस्त्या वनविभागात आहेत त्यांचा योग्य पाठ पुरावा करून त्यालाही न्याय मिळवून देण्याचे काम करणार आहोत. असे आदिवासी ठाकर युवा युवती प्रतिष्ठानचे पुणे जिल्हाध्यक्ष रितेश शिंदे यांनी सांगितले.

Previous articleपेठ येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघा़ंना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
Next articleमेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या आकाश ढमाले या युवा उद्योजकाची यशोगाथा