मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या आकाश ढमाले या युवा उद्योजकाची यशोगाथा

पुणे- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथिल आकाश ढमाले या पंचवीस वर्षाच्या युवकाने मीनाई ॲग्रो इंजिनीअरिंग या फर्मची स्थापना करून अल्पावधीतच २५ ट्राॅलींची विक्री केली आहे. तसेच शेतीउपयोगी विविध अवजारांची निर्मिती करून विक्री केली आहे.

खेड,आंबेगाव,जुन्नर या तालुक्यातील शेतकरी तसेच बाहेरील जिल्ह्यातूनही उत्पादनांना मागणी होत आहे.
आकाश ढमाले याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून काही काळ कंपन्यातही नोकरी केली,परंतु व्यवसाय करून मोठे व्हायचे त्यातून इतरांनाही रोजगार उपलब्ध होतील या उद्देशाने तीन वर्षापुर्वी फॅब्रिकेशनची छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली. कामातून मिळत असलेल्या नफ्यातून आवश्यक असणारी मशिनरी खरेदी केली.याच कालावधीत बीएचे शिक्षण पुर्ण केले.पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले.परंतु दोनवेळा थोडक्यात संधी हुकली,नंतर दोन वर्षे पोलीस भरतीच झाली नाही. त्यामुळे शेती उपयोगी अवजारांची व ट्रॅक्टर ट्राॅली निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आकाश ढमाले याला सुचली.ढमाले याला वडिल बाळशिराम ढमाले,आई मीना ढमाले, भाऊ सुरज ढमाले, यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी पुर्ण पाठींबा दिला. जागेचा प्रश्न नव्हता. कुटुंबियांची पुणे नाशिक महामार्गाच्या बाजूला जागा होती.भांडवल स्वबळावर उभारून सहा महिन्यापूर्वी लाॅकडाऊन असताना “मीनाई ॲग्रो इंजिनीअरिंग “या व्यवसायाचा श्रीगणेशा केला.सध्या सहा कामगार असून डिझायनिंग स्वतः आकाश ढमाले करीत आहे. चाळीस लाखांच्या उत्पादनांची विक्री केली आहे.ऑनलाइनचा जमाना असल्याने बाहेरील जिल्ह्यातील कामेही मिळत आहेत.गुणवत्ता, वक्तशीरपणा,दर्जेदार कामाची हमी,माफक दर यामुळे अल्पावधीतच मीनाई ॲग्रो इंजिनीअरिंग हे नाव ओळखीचे झाले आहे.

सध्याचा काळ कठीण असताना व मराठी युवक व्यवसायाकडे कानाडोळा करीत असताना आकाश ढमाले या युवकाने शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य न घेता व्यवसायात अल्पावधीतच घेतलेली भरारी नक्कीच प्रेरणादायी आहे.कोरोना महामारीने जग त्रस्त झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहे.अशा कठीण काळात आकाश ढमाले याने व्यवसायाची मुहुर्तमेढ केली.पारंपारिकतेला आधुनिकतेची ,नाविन्यतेची जोड देऊन युवकांना रोजगार उपलब्ध करून दिशादर्शक करीत असलेले कार्य ग्रामीण भागाला आशेचा किरण दाखवणारे आहे.

Previous article१०० वर्षांपूर्वीच्या आदिवासी ठाकर वस्तीला अखेर शासनाकडून न्याय
Next article कोरेगावमुळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उद्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत सर्वेक्षण