पेठ येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघा़ंना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

प्रमोद दांगट,निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील पेठ (पारगाव फाटा ) येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.याबाबत शुभम सुरेश पवळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शुभम पवळे व त्याचा भाऊ भुवणेश सुरेश पवळे हे आपल्या पारगाव फाटा येथील पोल्ट्रीवर जात असताना तुषार तोडकर व आकाश तोडकर ,दोघेही ( रा.पेठ ता.आंबेगाव पुणे ) यांनी पारगाव फाटा येथे फिर्यादीची गाडी अडवून तुम्ही माझ्या भावाला काल का मारले असे म्हणत पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच आकाश तोडकर यांनी लाकडी खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. याबाबत शुभम पवळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात फिर्याद दाखल केली.असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के.पी. कड पुढील तपास करत आहेत.

Previous articleशिनोलीमध्ये १ लाख ७० हजारांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
Next article१०० वर्षांपूर्वीच्या आदिवासी ठाकर वस्तीला अखेर शासनाकडून न्याय