मनसेच्या वाघांचे राजगुरूनगर मध्ये जंगी स्वागत

Ad 1

राजगुरूनगर-नागरिकांना होणाऱ्या वीजबिल वाढीसंदर्भात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने राजगुरूनगर येथे तोडफोड आंदोलन करण्यात आले होते. त्यातील मनसे पदाधिकारी मंगेश सावंत,नितिन ताठे, सोपान डुंबरे यांची आज जेल मधून सुटका झाली या वेळी जिल्हा अध्यक्ष श्री समिरभाऊ थिगळे यांच्या उपस्थितीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी ,तालुका अध्यक्ष संदिप पवार, आळंदी शहर अध्यक्ष अजय तापकीर, मनसे चाकण शहराध्यक्ष ऋषिकेश वाव्हळ, उपाध्यक्ष रोहित जाधव शुभम जगनाडे व सर्व मनसैनिक उपस्थित होते