Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण-Covid-19 या संसर्गजन्य आजारामुळे उद्धवलेल्या संकटाच्या काळात गोरगरीब जनतेला आधार देण्यासाठी शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी 10 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली कोरोना ग्रस्त रुग्णाना सहकार्य, रक्तदान शिबिर, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून मुंबई येथे कोरोना ग्रस्त व कोरोना योध्दांसाठी मदत ही पाठवली. तथापि त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सूधारणा व्हावी अशी प्रार्थना केली.
तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी पिक विमा लाभ देण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खोतकर साहेबांना खबरदारी घेऊनही लोकसंपर्क टाळता आला नाही यामध्येच त्यांना कोविड आजारांनी घेरले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव यांनी कडाची येथील महागणपती मंदिरात अभिषेक व आरती करण्यात आली. विघ्नहर्ता गणेशाकडे त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी महेशशेठ जाधव , शशीकांत नाणेकर माजी सरपंच, शिवसेना नेते मंगेश पऱ्हाड, दिपक नाणेकर, वैभव जाधव, रुपेश नाणेकर, काळुराम नाणेकर , संतोष जाधव,शिवराज नाणेकर, प्रविण नाणेकर, विजय नाणेकर, काळुसकर काका (नंदु) रोहन वाडेकर,नितिन वाव्हळ व ग्रेट मराठा ग्रुप आणि शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.